मिठाईत घातक रंग वापरल्यास कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

भिवंडी : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल व मिठाई विक्रेत्यांनी आरोग्याला घातक रंगाचा वापर करू नये. अन्यथा कारवाई करू, असा इशारा अन्न व औषध विभागाचे अधिकारी अरविंद खडके यांनी दिला आहे. 

भिवंडी शहरातील खाद्य पदार्थ विक्रेता संघाच्या वतीने हॉटेल व मिठाई दुकानदारांसाठी मार्गदर्शन सभा घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उदय लोहकरे, नीलेश मसारे, राजू आकरूपे आदी उपस्थित होते. 

हॉटेलमध्ये स्वच्छता व पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत. त्याकडे हॉटेलचालक व मालकाने प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्न पदार्थ तयार करताना आचारी हा निरोगी असावा. कामगार आजारी असल्यास अन्नातून इन्फेक्‍शन होण्याची भीती असते. त्याचबरोबर हॉटेल व दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारास पोशाख व हातमोजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून द्यावे, अशी सूचना खडके यांनी केली. 

नारळी पौर्णिमा ते दिवाळीपर्यंत विविध धार्मिक सण मोठ्या प्रमाणात येतात. या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. चांगल्या दर्जाची मिठाई देणे हे दुकानदारांचे कर्तव्य आहे. दूध व माव्यापासून तयार करण्यात आलेली मिठाई सुरक्षित ठेवणे आवश्‍यक आहे. मिठाई तयार करताना स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. पदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी उंदीर, झुरळ, माशांचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता प्रत्येक दुकानदार व हॉटेलचालकाने घ्यावी. अन्यथा कारवाईशिवाय पर्याय नाही, असा इशारा उदय लोहकरे यांनी दिला.