मोखाड्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय एका व्यासपीठावर

Mokhada
Mokhada

मोखाडा : मोखाडा तालुक्याच्या विकासासाठी आता मोखाडा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी एकवटले आहेत. शिवजयंतीचा मुहूर्त साधून तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी साधक बाधक चर्चा करण्यात आली आहे. या समस्या सोडविण्यासाठी थेट मंत्रालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय जमलेल्या सर्वपक्षीयांनी घेतला आहे. 

सरकारी लालफितीत आणि जाचक अटीत अडकलेल्या मोखाडा शहराच्या नळपाणीपुरवठा योजनेविषयी माजी उपसभापती बशीर अंसारी यांनी प्रश्न ऊपस्थित केला. यावेळी मोखाडा  नगरपंचायत मधील राष्ट्रवादीचे गटनेते प्रमोद कोठेकर, शिवसेना मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांनी नळपाणीपुरवठा योजनेचा आराखडा बनविला असून तो शासनाला सादर केला जाणार आहे. यासाठी सर्वपक्षीय मोखाडाकर आपण मंत्रालायात जावून संबधीत मंत्र्यांची भेट घेऊ असे मत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे यांनी व्यक्त केले. याला सर्वानुमते होकार मिळाला तर यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल भुसारा यांनी या भागात होणारी विकासकामे खरी गरज असलेल्या ठिकाणीच व्हायला हवीत अन्यथा कोट्यावधी खर्च होऊनही विकास मात्र जागेवरच राहील अशी भूमिका मांडली. यामुळे कामे करा मात्र तालुक्याच्या विकासाला पुरक अन गरजेचीच कामे करून तेथील विकासाला हातभार लावा असे सांगितले आहे.

या भागातील शिक्षण विभागाचे तिनतेरा वाजले असून अनेक शाळा वेळेवर उघडत नसल्याबाबतही लोकप्रतिनिधीं नी आरोप केले आहेत. याला जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम यांनी कबुली देत लवकरच यावर तोडगा काढला जाईल असे सांगितले आहे. तर सभापती प्रदिप वाघ यांनी तात्काळ बैठक घेऊन शिक्षक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना याबाबत सक्त सूचना देण्यात येतील असे सांगितले. या बैठकीत नगराध्यक्ष मंगला चौधरी, सदस्य मधुकर डामसे काँग्रेस कमिटी अध्यक्ष जमशीद शेख रामदास कोरडे ऋषीकेश लाडे प्रल्हाद कदम सर्व नगरसेवक आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, प्रत्येक महिन्याला तालुक्यातील विकास कामे व समस्यांचा आढावा घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com