अश्‍लील वर्तन करणाऱ्यास अटक

अश्‍लील वर्तन करणाऱ्यास अटक

मुंबई - अभिनेता सुमीत राघवन यांच्या पत्नी अभिनेत्री चिन्मयी यांच्यासमोर अश्‍लील वर्तन करणाऱ्या वाहनचालकाला विलेपार्ले पोलिसांनी आज संध्याकाळी अटक केली. 

विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक शाळेजवळ या कारचालकाने चिन्मयी यांच्याकडे पाहत अश्‍लील वर्तन केले होते. या घृणास्पद प्रकारानंतर संतप्त चिन्मयी यांनी त्याचा पाठलाग केला; परंतु तो कारमधून पळून गेला. चिन्मयी यांनी त्या वाहनाचा १९८५ एवढाच क्रमांक पाहिला आहे. या प्रकाराची माहिती चिन्मयी यांनी सुमीत यांना दिल्यानंतर त्यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पत्नीसोबत विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.  पोलिसांनी त्याला संध्याकाळी अटक केली. सार्वजनिक ठिकाणी महिलांसमोर अश्‍लील वर्तनाच्या चार घटना गेल्या वर्षभरात उजेडात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com