कबुतरखान्यावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

मुंबई - शिवसेनेच्या तक्रारीनंतर गिरगाव चौपाटीवरील कबुतरखाना शुक्रवारी (ता. 23) तोडण्यात आला. या कारवाईचा निषेधार्थ आमदार मंगलप्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केल्याने कबुतरखान्यावरून शिवसेना व भाजपमध्ये शीतयुद्ध पेटले आहे. 

गिरगाव चौपाटीवर काही महिन्यांपूर्वी कबुतरखाना बांधण्यात आला होता; परंतु समुद्रकिनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास परवानगी नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, शिवसेनेने पालिकेच्या डी विभाग कार्यालयाकडे कबुतरखान्याविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी पालिकेने हा कबुतरखाना तोडला. नागरिकांकडून या कबुतरखान्याबाबत तक्रारी आल्या होत्या, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. कारवाई केल्यानंतर लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. हा कबुतरखाना 2010 मध्ये आमदार निधीतून म्हाडाने बांधल्याने तो बेकायदा असूच शकत नाही. या कबुतरखान्याबाबत फेरआढावा घेण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्याचे लोढा यांनी सांगितले. 

दादरमधील कबुतरखाना हटविण्यासाठी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला पत्र दिले होते. कबुतरखान्यामुळे परिसरातील नागरिकांना श्‍वसनाचे आजार होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपचे नगरसेवक राज पुरोहित यांनी विरोध केला होता.

Web Title: marathi news mumbai kabutarkhana shivsena bjp