मेट्रोसाठी झाडे कापण्याला न्यायालयाची स्थगिती 

मेट्रोसाठी झाडे कापण्याला न्यायालयाची स्थगिती 

मुंबई - मेट्रो कामाच्या सबबीखाली सर्रास झाडे कापण्याला आज मुंबई उच्च न्यायालयाने 23 मार्चपर्यंत अंतरिम स्थगिती दिली. तसेच ठाण्यातील वृक्षछाटणीलाही न्यायालयाने 7 मार्चपर्यंत मनाई केली आहे. मेट्रोच्या नावाखाली मुंबई महापालिका सरसकट झाडे कापण्यास परवानगी देत आहे. ही परवानगी देण्यापूर्वी पाहणीही केली जात नाही, तसेच अहवालही सादर केला जात नाही, असे निदर्शनास आणणारी याचिका न्यायालयात पर्यावरणप्रेमी झोरू भटेना यांनी केली आहे. न्या. अभय ओक व न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली.

महापालिकेच्या झाडे कापण्याच्या कामाला परवानगी देण्याबाबत राज्याच्या महाधिवक्‍त्यांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. तातडीच्या परिस्थितीत (मालमत्ता किंवा जीवितहानीचा प्रश्‍न असल्यास) पालिका आयुक्त झाडे कापण्याबाबत निर्णय घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यासंबंधी समितीकडे मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित आहेत. मात्र, त्याबाबत रीतसर पाहणी करून निर्णय घेतला जात नाही, असा दावा याचिकादाराने केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com