केडीएमटी आढावा बैठक महापौर राजेंद्र देवळेकर घेणार

KDMT
KDMT

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन समिती सभापती संजय पावशे यांचा एक वर्षाचा कालावधी 28 फेब्रुवारी संपुष्टात येत असून आपल्या कालावधीत रखडलेले कामांना गती देण्यासाठी सभापती पावशे यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केली मात्र कामांना गती मिळत नसल्याने ती कामे आपल्या कालावधीत पूर्ण होण्यासाठी महापौर राजेंद्र देवळेकर यांना साकडे घातले असून शुक्रवारी (ता. 23) महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या दालनात केडीएमटीची विविध रखडलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन समिती मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून, युतीच्या करारानुसार सभापती पद दोन्ही पक्षाकडे एक एक वर्षाचे असून सध्या शिवसेनेचे संजय पावशे हे सभापती पदावर विराजमान आहेत. पावशे यांचा कालावधी 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येत असल्याने सभापती पदाच्या निवडणुकीसाठी तारीख निश्चित करण्यासाठी पालिकेच्या सचिव कार्यालय मार्फत कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असून सभापती पदाची निवडणूक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सभापती पदाचा कालावधी संपुष्टात येत असल्याने सभापती संजय पावशे यांनी रखडलेल्या कामांना गती मिळावी यावे यासाठी आज बुधवारी (ता. 21) डोंबिवली मधील केडीएमटीचा खंबाळपाडा डेपोची पाहणी केली यावेळी सदस्य सुभाष म्हस्के , मनोज चौधरी, कल्पेश जोशी आदीं उपस्थित होते. मात्र केडीएमटीची विविध कामे विहित मुदतीत होत नसल्याने अखेर सभापती संजय पावशे आणि शिवसेना सदस्यांनी महापौर राजेंद्र देवळेकर यांना साकडे घातले असून महापौर देवळेकर यांच्या दालनात शुक्रवारी (ता. 23) सकाळी महत्वपूर्ण बैठक होणार असून त्यात काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे. 

कामे रखडली आहेत, नागरिकांना सुविधा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा सुरू आहे, माझा कालावधी संपला तरी आमच्या युतीच्या काळात ही विकास काम पूर्ण होईल याचे समाधान असून त्यासाठी आज दौरा आणि महापौर यांची भेट घेऊन बैठक घेण्याची मागणी केल्याची माहिती केडीएमटी सभापती संजय पावशे यांनी सकाळला दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com