महागाई प्रतिकार महिला आंदोलनाच्या कमल देसाई यांचे निधन

Kamal-desai
Kamal-desai

मालाड (मुंबई) : महागाई प्रतिकार महिला आंदोलनाच्या आघाडीच्या नेत्या आणि गोरेगावातील समाजवादी चळवळीच्या हाडाच्या कार्यकर्त्या माजी आमदार कमल देसाई (छबुताई) यांचं गोरेगाव, मुंबई येथे मंगळवार दिनांक 20 रोजी वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले.

अहिल्याबाई रांगणेकर, कमल देसाई आणि मृणाल गोरे या महाराष्ट्रातील, खास करून मुंबापुरीतील समाजकारण आणि राजकारण ह्या मधील तीन रणरागिणी होत्या. कधी एकत्र तर कधी एकट्याने त्यांनी जनसामान्यांवरील अन्यायाविरुद्ध मूल्याधिष्टीत लढा दिला. कमलताई या छबुताई म्हणून कार्यकर्त्यायांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्या अगदी सहज पणे कोणत्याही प्रश्नावर मेगा फोन घेउन रस्त्यावर उतरायच्या अशा सामाजिक जाणिव आणि हळहळ असलेल्या मुंबईच्या सामाजिक आणि राजकारणातील त्रिमूर्ती निघून गेल्या. आज दुपारी त्यांचं अंत्यसंस्कार ओशीवरा येथील विद्युतदाहिनीत करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com