कैद्यांच्या भेटीसाठी नातेवाइकांना मिळणार अपॉइंटमेंट 

मंगेश सौंदाळकर
रविवार, 21 जानेवारी 2018

मुंबई : कैद्यांना भेटण्यासाठी मुलाखत कक्षात नातेवाइकांची होणारी गर्दी रोखण्याकरिता तुरुंग प्रशासनाने नवा पर्याय शोधून काढला आहे. नातेवाइकांनी टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर त्यांना आता अपॉइंटमेंट दिली जाईल आणि त्यानुसार गर्दी टाळून कैद्यांची भेट घेता येणार आहे. 

राज्यातील तुरुंगांमध्ये प्रथमच असा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी ऑर्थर रोड तुरुंगात 12 नवीन पारदर्शक मुलाखत कक्ष तयार करण्यात आले आहेत. लवकरच त्यांचे उद्‌घाटन केले जाणार आहे. तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा कारागृहे, तर 172 उपकारागृहे आहेत.

राज्यातील विविध तुरुंगांत मिळून 31 हजार 241 कैदी आहेत. विविध गुन्ह्यांत तुरुंगवास झालेल्या कैद्यांना भेटण्याकरिता मुलाखत कक्ष असतो. काही मिनिटांच्या भेटीसाठी नातेवाइकांना कित्येक तास अगोदर यावे लागते. त्यामुळे मुलाखत कक्षाबाहेर गर्दी वाढून भांडण, शाब्दिक वादाचे प्रकार होतात. त्याची दखल घेऊन तुरुंग प्रशासनाने हा पर्याय शोधला आहे.

मुलाखतीकरिता येणाऱ्या नातेवाइकांसाठीच्या 'अपॉइंटमेंट'चा उपक्रम संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे. मुलाखतीकरिता येणाऱ्या नातेवाइकांची माहिती अगोदर कळवावी लागणार आहे; प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असून, त्यासाठी तुरुंग प्रशासनाने एक ऍप तयार केले आहे. 

नवीन पारदर्शक कक्षाची रचना 
मुंबई मध्यवर्ती कारागृहात (ऑर्थर रोड) 12 नवीन पारदर्शक कक्ष तयार करण्यात आले आहेत. त्या कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे, इंटरकॉमची सुविधा असेल. पारदर्शक काचेतून कैदी नातेवाइकांशी संवाद साधू शकतात. सध्या ऑर्थर रोडमध्ये 13 कक्ष आहेत.

तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हे नवीन कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुलाखतीला आलेल्या नातेवाइकांच्या हातांचे ठसे घेतले जातील. कैद्यांना कोण भेटायला येते, यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Web Title: marathi news Mumbai News Mumbai Police