समाजशास्त्र उत्तरपत्रिकाही हाती तपासण्याची नामुष्की 

नेत्वा धुरी
रविवार, 30 जुलै 2017

मुंबई : मुंबई विद्यापीठात इतिहासाच्या उत्तरपत्रिका हाताने तपासण्याची नामुष्की ओढवलेली असतानाच समाजशास्त्राच्या उत्तरपत्रिकाही हातानेच तपासल्या जाणार असल्याचे समजते. 

समाजशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका स्कॅन न झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. 'थीअरायझिंग डेव्हलपमेंट ऍण्ड ग्लोबलायझेशन' या समाजशास्त्र विषयाच्या तब्बल 87 उत्तरपत्रिका हाताने तपासल्या जाणार आहेत. समाजशास्त्र विषयातील 'डाएस फोरा स्टडीज' या विषयाच्या केवळ चार उत्तरपत्रिका होत्या. त्याही स्कॅन झालेल्या नाहीत. या उत्तरपत्रिका स्कॅन करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुन्हा तांत्रिक अडचणी आल्यास या चार उत्तरपत्रिकाही हातानेच तपासल्या जातील. एकीकडे संगणकावरील उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे काही उत्तरपत्रिका हातांनी तपासण्याचे काम सुरू आहे. प्राध्यापक गोंधळून गेले आहेत. 

शनिवारीही उत्तरपत्रिका अपलोड होत नव्हत्या. निकालासाठी केवळ एक दिवस शिल्लक असताना संगणकावर ही अडचण आली होती. शारीरिक शिक्षण या विषयाच्या उत्तरपत्रिकांमध्ये शनिवारी पुन्हा गोंधळ दिसून आला. एका उत्तरपत्रिकेतील पहिले पान इंग्रजी माध्यमाचे आणि दुसरे पान मराठी माध्यमाचे असल्याचे एका प्राध्यापकाला दिसले. तिसरे पान तर भलत्याच विषयाचे होते.