नीरव मोदीच्या प्रतिमेला राष्ट्रवादीचे 'जोडे मारो'

Mumbai News Nirav Modi NCP Jode Maro Agitation
Mumbai News Nirav Modi NCP Jode Maro Agitation

ठाणे : सुमारे 12 हजार कोटी लुटून परागंदा झालेल्या नीरव मोदी याच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बॅंक जबाबदार आहे, तसा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी करून पीएनबीच्या नौपाडा शाखेसमोर शनिवारी निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोदी याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
 
डावोसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नीरव मोदी छायाचित्र काढून घेतो. पंतप्रधान मोदी यांच्या नाकाखाली हे भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे मन की बात करणाऱ्या पंतप्रधानांनी आता जनहित की बात करावी, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला. या वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोदीच्या प्रतिमेला चपलांनी बडवले. तसेच पंजाब नॅशनल बॅंकेच्या अधिकाऱ्यांचाही निषेध केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com