शिवजयंतीनिमित्त कल्याण पूर्वमधील 'श्री शिवसंस्कार महोत्सव 2018' ला सुरवात

Mumbai News Shivjayanti kalyan east
Mumbai News Shivjayanti kalyan east

कल्याण : कल्याण पूर्व सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजित 'श्री शिव संस्कार महोत्सव 2018' ला शनिवार अनुभवा सर भालाजी पेंढारकर निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट महोत्सवाने सुरवात झाली. दिवसभरात एक हजारांहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहिला. तर उद्या सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीने समारोप होणार आहे.

कल्याण पूर्व सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजित श्री शिव संस्कार महोत्सव 2018 हा शनिवार ते सोमवार कालावधीत आयोजित करण्यात आला असून, शनिवारी सकाळी अनुभवा सर भालाजी पेंढारकर निर्मित छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट महोत्सव कल्याण पूर्व दादासाहेब क्रीडांगणमध्ये  सुरवात झाली. या महोत्सवाचे उद्घाटन खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार शिंदे यांनी आयोजकांचे कौतुक केले तर उपस्थित विद्यार्थी वर्गाशी संवादही साधला. यावेळी चित्रपट पाहून काय करणार असा सवाल केल्यावर आदित्य गुंजाळ या विद्यार्थ्याने उत्तर दिले, की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील किमान एक तरी गुण आमच्या अंगी आत्मसात करण्याचा प्रयन्त करू असे उत्तर दिले. तर यावेळी त्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला . 

दिवसभर चित्रपट महोत्सवात सुमारे एक हजारांहून अधिक विद्यार्थ्यानी चित्रपट पाहिला. या उद्घाटनप्रसंगी सचिव रुपेश गायकवाड, विश्वस्त नाना सूर्यवंशी, अनिल घुमरे, राजू अंकुश, रवी हराळे, नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड,  के एल वासनकर, अण्णा रोकडे, संजय गायकवाड, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आज रविवार राज्यस्तरीय प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धा झाली यात राज्यातून 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला . 


सोमवारी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

सोमवार श्री शिव संस्कार महोत्सव 2018 चा समारोप होणार असून, सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात चित्ररथ स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यासाठी लेझिम स्पर्धा विशेष आकर्षण असणार असून या भव्य मिरवणूकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विश्वस्त नाना सुर्यवंशी यांनी केले आहे .


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com