आदिवासी विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प  - विष्णु सवरा

भगवान खैरनार
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मोखाडा (पालघर) : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आदिवासी व अनुसुचीत जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तालुक्याच्या ठिकाणी एकलव्य निवासी शाळांची केलेली घोषणा आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासाला बळ देणारी असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या वर्षीचा अर्थसंकल्प शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात सामन्य माणूस शेती आणि ग्रामीण विकासावर भर देण्यात आला आहे. या अर्थ संकल्पात आदिवासी शिक्षणासाठी केंद्रशासन एक लाख कोटी खर्च करणार आहे. तसेच तालूक्याच्या ठिकाणी उभारण्यात येणारे एकलव्य विद्यालय हे नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर असणार आहे. रस्ते शहरांचा विकास यालाही प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कौशल्य केंद्र उभारण्यात येणार आहे. 10 कोटी गरीब कुटुबांसाठी आयुष्यमान भारत योजना राबविण्यात येणार आहे. सर्व समान्य माणसाला समोर ठेवून हा अर्थ संकल्प सादर करण्यात आल्याची प्रतिक्रीया सवरा यांनी दिली.

Web Title: Marathi news mumbai news vishnu savara budget