प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर विमानतळ

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर विमानतळ

नवी मुंबई - नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर उभे राहणार असून, त्यांनी शेतजमिनींच्या केलेल्या बलिदानामुळे हा प्रकल्प उभा राहू शकला, असे कौतुकोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. प्रकल्पग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी व त्या बदल्यात त्यांना देशातील सर्वाधिक महागडे पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्यात दिवंगत माजी आमदार लोकनेते दि. बा. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असेही मुख्यमंत्री म्हणाले. फडणवीसांच्या या कौतुकोद्‌गारामुळे एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन संपादन करण्यापासून ते विमानतळाचे विकासपूर्व कामांना सुरुवात होण्यात स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शवला होता. जमिनींच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळवून देण्यात दि. बा. पाटील यांच्यासोबत भाजपचे नेते रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर खांद्याला खांदा लावून पुढे होते; मात्र दि बांनंतरच्या काळात प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन विस्कटले आणि मागे पडत चालले होते. अशातच ठाकूर कुटुंबीयांच्या कंपनीला विमानतळाचे काम मिळाल्याने त्यांच्याविरोधात स्थानिकांमध्ये रोष निर्माण केला जात होता. याचा फायदा घेत विमानतळाच्या आडून विरोधी पक्षांकडून स्थानिकांमध्ये ठाकूर घराण्याबद्दल रोष वाढवण्याचा प्रयत्न केला जात होता. ़़

आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हे भाजपला परडवणारे नव्हते; मात्र भूमिपूजनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात विमानतळाचे श्रेय प्रकल्पग्रस्त व प्रकल्पग्रस्तांचे श्रद्धास्थान दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना देऊन एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. अशातच आमदार प्रशांत ठाकूर या एकमेव आमदाराला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत मंचावर जागा देऊन फडणवीस यांनी ठाकूर यांना आपल्या गोटात विशेष जागा असल्याचेही दाखवून दिले आहे. ठाकूर यांच्यासोबत रायगडचे नवीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण हेसुद्धा मंचावर होते. विमानतळ भूमिपूजनाच्या निमित्ताने यावेळी फडणवीस यांनी चांगलीच संधी साधली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com