जागतिक मानवी हक्क दिन सह्याद्री अतिथी गृहात साजरा

Marathi News_Mumbai_International Human Rights day
Marathi News_Mumbai_International Human Rights day

मुंबादेवी - सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे आज (ता. 10) मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला. माजी मुख्य न्यायाधिश बी. एन. श्रीकृष्ण, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. आर. बन्नुरमठ, आयोगाच्या सचिव अंशु सिन्हा, सदस्य एम. ए. सईद, विशेष पोलिस महानिरीक्षक किशोर जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. 

कमला मेहता अंध शाळेच्या विद्यार्थीनींनी 'जय देवी शारदे प्रसन्न होऊन वर तू आम्हा दे' हे गीत गात कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आजचा दिवस 70 वा मानवी हक्क दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधत मलबार हिल येथील सह्याद्री अतिथी गृहात विविध लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि मानवी हक्क संदर्भात कार्यरत असणाऱ्या एनजीओच्या पदाधिकारी यांना दोन सत्रांत व्यासपीठावरील मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

या चर्चा सत्राचा मुख्य हेतू हा जनमाणसात आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानवी हक्क दिनाविषयी जागृकता निर्माण करणे हा होता. मानवी हक्क म्हणजे काय? त्याचे कार्य कसे चालते? आपल्या समस्या आपल्यावरील अन्यायाला दूर करण्याकरीता न्याय मिळविण्यासाठी काय करावे? या आणि अशा अनेक बाबीसाठी मानवी हक्क आयोग फारच उपयोगी येत आहे. एका साध्या कागदावर करण्यात आलेल्या तक्रारीची शहानिशा करुन तात्काळ पिडितास न्याय मिळण्याकरिता आयोगाची यंत्रणा कार्यरत होत असते. आपले मानवी हक्क आणि न्याय मिळविण्यास मानवी हक्क आयोग कसे कार्य करते याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. 

के. सी. कॉलेज, अदवनी कॉलेज, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, टीआयएसएस, नॅशनल लॉ यूनिवर्सिटी पवई, अमेटी यूनिवर्सिटी, मुंबई यूनिवर्सिटी, किर्ती कॉलेज, गुरु नानक कॉलेज, विलेपार्ले कॉलेज यांच्या व्यतिरिक्त मानवी हक्कांच्या संदर्भात काम करणाऱ्या अशासकीय संस्था हर्टस फाउन्डेशन मुंबई, ह्यूमन राइट्स काउंसिलिंग पुणे, जस्टिस एंड केअर, पॉलीएटिव केअर, अपना घर वसई, डिग्निटी फाउंडेशन या विद्यार्थी आणि संस्थांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
 
'मागील 2 ते 3 वर्षांपासून आम्ही येथे मानवी हक्क आयोगातर्फे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहत असतो. आमचे सर प्रा. डॉ. हर्षद भोसले यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभते. आम्हाला कायद्याचा अभ्यास करायचा असून वकील झाल्यानंतर गोरगरीब जनतेच्या मानवी हक्कांसाठी आमची शैक्षणिक गुणवत्ता उपयोगी यावी, ज्यांना कायदे माहित नाही त्यांच्या समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील', असे मत किर्ती कॉलेजच्या विद्यार्थीनी धनश्री रणदिवे, पॉलिटिकल सायन्स अभ्यासक्रमाची अर्चना पांचाळ, प्रियंका सारंग यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com