पदव्युत्तर प्रवेश नाकारलेल्या अपंग विद्यार्थ्यांना दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मुंबई - वैद्यकीय शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अपंग प्रवर्गातून अर्ज केलेल्या दोन विद्यार्थ्यांना त्याच प्रवर्गातून प्रवेश देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. 

चंदन बोराले आणि संदीप दडमल या विद्यार्थ्यांना "नीट' परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर अपंग प्रवर्गातून प्रवेश द्यावा, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे. 

चंदन आणि संदीप या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश अपंग प्रवर्गातून नाकारल्याने, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. खेमकर आणि न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. पोलिओमुळे अपंगत्व आलेल्या या विद्यार्थ्यांना मेडिकल बोर्ड ऑफ जनरल हॉस्पिटलने (चंद्रपूर) 50 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिले होते. त्यांना अपंग प्रवर्गातून 2003मध्ये नागपूरच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात आला होता. एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मेडिकल ऑफिसर म्हणून नागहिड येथील सरकारी रुग्णालयात इंटरर्नशीपही केली. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश देताना त्यांना अपंग प्रवर्गातून नाकारण्यात आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता.