‘मोहन भागवतांनी सर्वांना फसवले’

Prakash-Ambedkar
Prakash-Ambedkar

मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वांची फसवणूक केल्याचा आरोप भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. मोहन भागवत यांनी लोकांना पुन्हा फसवण्यासाठी आणि आम्ही बदललो आहोत, हे दाखवण्यासाठी इतर पक्षांच्या नेत्यांना बोलावले होते, असा आरोप आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. भिडेंची पिलावळ ‘राष्ट्रवादी’मध्ये आहे. उदयनराजे भोसले भिडेंची बाजू मांडतात, मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसे जाणार, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com