मोनो रेल धावणार मे महिन्यात? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - मोनो रेलच्या व्यवस्थापनासाठी आयएलएफएस या कंपनीने रिलायन्सपेक्षा कमी दराची निविदा भरली आहे. निविदांची छाननी झाल्यानंतर व्यवस्थापनासाठी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. वडाळा ते जेकब सर्कलपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यातील मोनोच्या सुरक्षा चाचण्या पार पडल्या असून, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मे महिन्यात मोनो धावण्याची शक्‍यता आहे. 

मोनो रेलच्या डब्याला लागलेल्या आगीनंतर वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यातील वाहतूक बंद झाली आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यामध्येही मोनो सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या होत्या. पहिल्या टप्प्यातील मोनोचे व्यवस्थापन स्कोमी या मलेशियन कंपनीकडे होते. कंपनीसोबतचा करार संपुष्टात आल्याने एमएमआरडीएकडून कंपनीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली; मात्र या प्रक्रियेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर चौथ्यांदा मागवलेल्या निविदांना रिलायन्स इन्फ्रा कंपनी आणि आयएलएफएस या कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये आयएलएफएस या कंपनीने कमी दराची निविदा भरली आहे. 

कंपन्यांनी भरलेल्या निविदांची छाननी केल्यानंतर याबाबत एमएमआरडीए अंतिम निर्णय घेणार आहे. 

जेकब सर्कल ते चेंबूर मार्ग 
दुसऱ्या टप्प्यातील मोनोच्या सुरक्षा चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार आहे. व्यवस्थापन कंपनीची निवड झाल्यानंतर आणि सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच जेकब सर्कल ते चेंबूर या मार्गावर मोनो सुरू होणार आहे. 

Web Title: Mono Rail to run in May