झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

अनेकदा चौकशीला बोलावूनही तो उपस्थित न राहिल्यामुळे तो तपासात मदत करत नसून या प्रकरणी वॉरंटची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी ईडीकडून अनेकदा समन्स पाठवूनही नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही.

मुंबई - वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 

झाकीर नाईकशी संबंधित 18 कोटी 37 लाखांची मालमत्ता जप्त केल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्याच्या भोवताली फास आणखी आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी अनेकदा समन्स पाठवूनही चौकशीला उपस्थित न राहिल्यामुळे 'ईडी'ने विशेष पीएमएलए न्यायालयात त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली होती. न्यायालयाने आज (गुरुवार) ती मान्य केली आहे. 

अनेकदा चौकशीला बोलावूनही तो उपस्थित न राहिल्यामुळे तो तपासात मदत करत नसून या प्रकरणी वॉरंटची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी ईडीकडून अनेकदा समन्स पाठवूनही नाईक चौकशीसाठी उपस्थित राहिला नाही. त्याने एकदा प्रश्‍नांची उत्तरे ईमेलद्वारे देण्यास होकार दर्शवला होता. त्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली होती; पण ईडीने त्यास नकार दिला होता.

Web Title: Mumbai court issues non-bailable warrant against Zakir Naik in money-laundering case