खरीप पीककर्जासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबई - खरीप पिकासाठी दहा हजार रुपये कर्ज देण्याची मुदत सहकार विभागाने 15 जुलैवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविली आहे.

लांबलेला पाऊस आणि पीककर्जाचे वाटप खूप कमी शेतकऱ्यांपर्यंत झाल्याने अखेरीस राज्य सरकारला ही मुदत वाढवावी लागली.

खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांचे कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यातच येत्या आठ दिवसांत सरकारला पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागणार आहे. शिवाय खरीप पिकासाठी दहा हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी सहकार विभागाला मोठ्या प्रमाणात येत आहेत. याचीच दखल घेत विभागाने खरीप पिकासाठीच्या कर्जाची मुदत 15 जुलैवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा सरकारी आदेश काढला आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, की अजूनही पेरण्या सुरू आहेत; तसेच खरिपासाठी दहा हजारांचे कर्ज देण्याचा निर्णय 28 जूनला जाहीर करण्यात आला. त्यामुळे 17 दिवसांची ही मुदत वाढवून 31 ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याचा लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला.