ट्युमरची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

जगातला सर्वात मोठा ट्युमर म्हणून नोंद

मुंबई : लोकमान्य टिळक रुग्णलयात महिलेच्या पोटातून काढलेला 5.5 किलो वजनाच्या ट्युमरची जगातील सर्वात मोठा ट्युमर म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद केली आहे. 

एक वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबरला बिहारवरून आलेल्या मंजूदेवी या महिलेच्या मूत्रपिंडातून हा ट्युमर काढण्यात आला होता. बिहार आणि मुंबईतील अनेक डॉक्टरांकडून उपचार घेतलेल्या या महिलेवर शस्त्रक्रिया करण्यास कोणताही डॉक्टर धजावला नव्हता. टिळक रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारलं. 

ट्युमरमुळे भूक न लागणाऱ्या या महिलेतच्या शरिरातील रक्त कमी झाले होते आणि ती अशक्त झाली होती. डॉक्टरांनी सुरुवातीला या आव्हानांवर मात करण्याचा निर्णय घेतला.. त्यानंतर शस्त्रक्रिया काढून ट्युमर काढला. 

शस्त्रक्रिया करण्यापूर्वी फक्त ट्युमरचा आकार माहीत होता. अशा प्रकारचा ट्युमर काढताना रुग्णाच्या जीवाला धोका असतो. मंजूची मुलं लहान असल्याने ते आव्हान मोठं वाटत होतं. शस्त्रक्रियेनंतर ट्युमरच वजन केलं. त्यानंतर गिनिज बुकसाठी नोंदणी केली. तब्बल एक वर्ष त्यासाठीची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती युरॉलॉजी विभागी चे प्रमुख डॉ. अजित सावंत यांनी दिली.