उद्धव ठाकरेच महापौर पदाचा उमेदवार ठरवणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेवकांची यादी सादर केली आहे. तेच महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी बुधवारी (ता. 1) दिली.

महापौरांची निवड करताना पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकाचे काम, तो किती वेळा निवडून आला आहे, त्याची काम करण्याची पद्धत आदी बाबी विचारात घेतल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.

महापौरपदासाठी कोणाचे नाव निश्‍चित होईल, असे वाटते, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "प्रसारमाध्यमांनी महापौर पदासाठीच्या इच्छुक नगरसेवकांची नावे प्रसिद्ध केली आहेत. मी नव्याने नावे सांगायची गरज नाही.' नगरसेवक यशवंत जाधव यांचा महापौर पदासाठीचा पत्ता कापला, याबाबत शेवाळेंना विचारले असता ते म्हणाले, त्यांना विरोधी पक्षनेते करण्याचे ठरले होते. कोकण आयुक्तांकडे गटनेत्याचे नाव नोंदवावे लागते. त्यांच्या नावाचा आधीच विचार झाला होता. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना अर्थ नाही.