प्रभाग आरक्षण : मुंबई महानगरपालिका राज्य निवडणूक आयोगाला अहवाल सादर करणार

सूचना व हरकतींवर घेतलेली दखल मांडणारा अहवाल अंतिम टप्प्यात
Mumbai Municipal Corporation will submit report to State Election Commission Ward reservation ward structure
Mumbai Municipal Corporation will submit report to State Election Commission Ward reservation ward structuresakal

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग निश्चितीनंतर आरक्षणाच्या लॉटरीच्या प्रक्रियेवर २३२ सूचना आणि हरकती मुंबई महापालिकेकडे दाखल झाल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सूचना आणि हरकतींची दखल मुंबई महानगरपालिकेला घ्याी लागणार आहे. तसेच सूचना व हरकतींवर नेमका निर्णय घेतला याचा अहवाल महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाला येत्या दिवसात सादर करावा लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून प्रभाग आरक्षणाची राजपत्रातील घोषणा ही येत्या १३ जूनला होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेला एकुण २३२ सूचना आणि हरकती या प्रभाग आरक्षणाच्या लॉटरीच्या निमित्ताने दाखल करण्यात आल्या. सूचना आणि हरकतींवर मुंबई महापालिकेला राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार दखल घ्यावी लागणार आहे. याबाबतचा अहवालही मुंबई महापालिका राज्य निवडणूक आयोगाला सादर करेल अशी माहिती महापालिकेचे सहायक महापालिका आयुक्त संजोग कबरे यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १३ जूनला राजपत्रात या प्रभाग आरक्षणाची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सूचना व हरकतींनंतर जनसुनावणी नाही

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सूचना आणि हरकतींवर योग्य ती दखल घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत जनसुनावणी घेण्यात आली होती. पण सूचना आणि हरकतींवर मात्र जनसुनावणी घेण्यात येणार नाही. आयोगाकडून या टप्प्यात कोणतीही जनसुनावणी घेण्याचे आदेश नाहीत, असेही ते म्हणाले. सूचना आणि हरकतींवर मुंबई महानगरपालिका पातळीवर योग्य तो निर्णय घेण्याचे आदेश आहेत. त्यानुसार २३२ पैकी काही सूचना आणि हरकतींवर मुंबई महानगरपालिकेकडून दखल घेण्यात येईल. तसेच या सर्व प्रक्रियेचा अहवाल हा राज्य निवडणूक आयोगाला येत्या दिवसांमध्ये दाखल करण्यात येईल असेही ते म्हणाले. सध्या अहवालाच्या निमित्ताने मुंबई महापालिकेत बैठका सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com