मुंबई महापालिकेच्या मेस्को एरोस्पेस हेलिकॉप्टर जप्ती अंगलट

मुंबई महापालिकेने थकीत १.९५ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कोरोना महामारीपूर्वी मेस्को एरोस्पेसची दोन हेलिकॉप्टर जप्त केली होती.
mumbai-municipal-corporation
mumbai-municipal-corporationsakal
Summary

मुंबई महापालिकेने थकीत १.९५ कोटी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कोरोना महामारीपूर्वी मेस्को एरोस्पेसची दोन हेलिकॉप्टर जप्त केली होती.

मुंबई - मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal) थकीत १.९५ कोटी मालमत्ता कर वसूल (Property Tax Recovery) करण्यासाठी कोरोना महामारीपूर्वी मेस्को एरोस्पेसची दोन हेलिकॉप्टर (Mesco Aerospace Helicopter) जप्त (Seized) केली होती. कंपनीचा मार्च २०२२ पर्यंतचा थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी जुहू हँगरवर उभी असलेली दोन हेलिकॉप्टर जप्त केल्यानंतर पालिकेला मोठी वसुली झाल्यासारखे वाटले; मात्र जप्त केलेल्या हेलिकॉप्टरमधील अनेक भाग गहाळ झाल्याने ते आता केवळ ४५ लाख किमतीचे असल्याचे लक्षात येताच पालिकेचा हिरमोड झाला आहे.

मेस्को एरोस्पेसचा थकीत मालमत्ता कर २.७६ कोटीपर्यंत वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली; मात्र जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचे अनेक महत्त्वाचे भाग गहाळ झाल्याने हे हेलिकॉप्टर केवळ भंगार म्हणून विकले जाऊ शकते. त्यामुळे उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला पत्र लिहिण्याचा पालिकेचा विचार आहे.

मेस्को एरोस्पेसकडे मार्च २०१९ पर्यंत मालमत्ता कराची १.६५ कोटी येणे बाकी होती. त्या वेळी पालिकेने त्यांच्या कार्यालयातील पाण्याचा पुरवठा खंडित केला, परंतु कंपनीने अद्याप पैसे भरले नाहीत. पुढील वर्षी ही थकबाकी २.७६ कोटींपर्यंत वाढली होती. त्यामुळे पालिकेने जुहू एरोड्रोम येथील त्यांची दोन हेलिकॉप्टर जप्त केली. हेलिकॉप्टर आणि महागड्या कार आदी जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी पालिकेने मालमत्ता कर कायद्याच्या ‘शेड्यूल-के’चा वापर प्रथमच केला होता. दोन हेलिकॉप्टर जप्त केल्यानंतर केवळ पाच दिवसांत पालिकेने एक हजार २९३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला.

मूल्यांकनासाठी तृतीय पक्षाची नियुक्ती

सदर हेलिकॉप्टर किमान २५ वर्षे जुने आहे. समुद्राच्या वाऱ्यामुळे ते गंजण्याची शक्यता आहे. भंगाराची किंमत ४५ लाखांपेक्षा जास्त होणार नसल्याने पालिकेने त्याचा लिलाव करण्याचा आणि हेलिकॉप्टरच्या किमतीचे मूल्यांकन करण्यासाठी तृतीय पक्षाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

किंमत अपेक्षेपेक्षा कमी

आम्ही हेलिकॉप्टरच्या किमतीचे मूल्यांकन केले आहे, परंतु किंमत आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. चौकशी केल्यानंतर आढळले, की हेलिकॉप्टरमधील अनेक महत्त्वाचे भाग गायब आहेत आणि त्यामुळे त्याचे मूल्य जास्त नाही, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com