मतदारराजा तुझ्याचसाठी!

मतदारराजा तुझ्याचसाठी!

प्रत्येक मतदारामागे 103 रुपये खर्च

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (ता. 21) मतदार राजा होणार आहे. वयोवृद्ध, अपंग मतदारांना इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील मतदान केंद्रावर नेण्यासाठी एक हजारहून अधिक पालख्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. महापालिका प्रत्येक मतदारासाठी 103 रुपये खर्च करणार आहे, तर निवडणूक प्रक्रियेसाठी 95 कोटी खर्च होतील, असा अंदाज आहे.

महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी शनिवारी (ता. 18) पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 21) मतदान होत आहे. त्यासाठी सात हजार 304 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. पालिका, बेस्ट आणि राज्य सरकारचे 42 हजार 797 कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी काम करतील. शहरात 17 अतिसंवेदनशील आणि 688 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत.

निवडणुकीसाठी दोन हजार 275 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 717 अपक्ष आहेत. निवडणुकीसाठी पालिकेने 100 कोटींची तरतूद केली आहे. त्यातील 95 कोटी खर्च होण्याची शक्‍यता आहे. प्रत्येक मतदारामागे पालिका 103 रुपये खर्च करणार आहे.
मतदान केंद्राच्या पहिल्या मजल्यावर एक हजार 65 बुथ आणि दुसऱ्यावर 54 बुथ असल्याने तेथे ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना जाता यावे यासाठी 827 रॅम्प तयार करण्यात आले आहेत, तर एक हजारच्या आसपास पालख्याही तयार ठेवण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी सुमारे आठ कोटी 50 लाख, तर मंडप उभारण्यासाठी सुमारे 20 कोटी खर्च अपेक्षित आहे.

वाहनांचा ताफा
बेस्ट ः 724 बसगाड्या
आरटीओ ः तीन हजार 449 वाहने
टॅक्‍सी ः दोन हजार 106

मतदार घटले, उमेदवार वाढले
मुंबईत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत दहा लाखांहून अधिक मतदार घटले आहेत. मतदारांची संख्या कमी असल्याने मतदान केंद्रे कमी झाली असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सांगितले. त्याचबरोबर अपेक्षेप्रमाणे उमेदवारांची संख्या वाढली असली तरी अपक्ष उमेदवारांची संख्या कमी झाली आहे.

मतदान यंत्रे - 9350... 7343
मतदार - सुमारे एक कोटी.. 91 लाख 80 हजार 491
मतदान केंद्रे - 8326... 7304
उमेदवार - 2235... 2275
अपक्ष - 970... 717

मोठ्या पक्षांचे उमेदवार
- शिवसेना ः 227
- कॉंग्रेस ः 221
- भाजप ः 211
- मनसे ः 201
- राष्ट्रवादी कॉंग्रेस ः 171

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com