मुंबई महापालिका होणार पेपरलेस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

मुंबई - निवडणुकीनंतर महापालिकेचा कारभार पेपरलेस करण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्यासाठी नगरसेवकांना कार्यक्रम पत्रिका ईमेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका निवडणुकीनंतर मांडण्याची तयारी केली आहे.

मुंबई - निवडणुकीनंतर महापालिकेचा कारभार पेपरलेस करण्याचा विचार प्रशासन करत आहे. त्यासाठी नगरसेवकांना कार्यक्रम पत्रिका ईमेलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव महापालिका निवडणुकीनंतर मांडण्याची तयारी केली आहे.

महापालिकेने नगरसेवकांना लॅपटॉप दिले. त्याचा काहीच उपयोग होत नाही. निम्म्या नगरसेवकांचे लॅपटॉप घरी धूळ खात पडले आहेत. महापालिका निवडणुकीनंतर या लॅपटॉपवरील धूळ झटकली जाणार आहे. महापालिकेच्या महासभेची तसेच विविध समित्यांच्या कार्यक्रम पत्रिका सदस्यांच्या घरी पाठवल्या जातात. निवडणुकीनंतर ही पद्धत बंद होण्याची शक्‍यता आहे. पालिकेचा सर्व कारभार ऑनलाईन करण्यासाठी या कार्यक्रम पत्रिका ईमेलवरून नगरसेवकांना पाठविण्याचा विचार प्रशासन करत आहे.

महापालिकेच्या चिटणीस विभागाने ईमेलने कार्यक्रम पत्रिका पाठविण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी त्यांना सर्व्हर रूमची आवश्‍यकता असून ती प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्यास ईमेलवरून कार्यक्रम पत्रिका पाठविणे सोपे होणार आहे.

ईमेलवरून कार्यक्रम पत्रिका पाठविल्यास छपाईपासून वितरित करण्यापर्यंत सर्व खर्च वाचणार आहे. कार्यक्रम पत्रिका ऑनलाईन देण्यासाठी पालिका निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांसमोर प्रस्ताव मांडण्यात येईल.
- अजोय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिका

नगरसेवकांची पाठ
महापालिकेने 2009 मध्ये एक कोटी रुपये खर्च करून सर्व नगरसेवकांना लॅपटॉप दिले होते. त्यानंतर नगरसेवकांसाठी प्रशिक्षण वर्गही झाला. त्यात निम्म्यापेक्षा कमी नगरसेकांनी हजेरी लावली होती. तेव्हापासून पालिका कार्यक्रम पत्रिका ऑनलाईन देण्याचा विचार करत आहे, परंतु नगरसेवकांकडून प्रतिसाद मिळत नाही.

मुंबई

लालठाणे- 'गाव करेल ते राव काय करेल' या उक्तीची प्रचिती सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला अगदीच नऊ किलोमीटर अंतरावर वसलेल्या...

07.30 PM

कल्याण : गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवतात. यावेळी नागरिकांच्या आरोग्याला घातक...

03.36 PM

सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून...

03.12 PM