मुंबईच्या पाऊसबळींची संख्या दहावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

मुंबई - गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे नाल्यात अडकून पडलेल्या श्‍वानाला वाचवताना वाहून गेलेल्या अंधेरीतील तरुणाचा मृतदेह रविवारी (ता. 3) सहा दिवसांनी मरोळच्या नाल्यात आढळला. इमामसाब मेहबूब शेख (25) असे त्याचे नाव आहे. झाड कोसळून जखमी झालेले भिकू नांजी बभनिया (42) यांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील पाऊसबळींची संख्या दहा झाली आहे.

पावसात बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे मृतदेह सापडू लागले आहेत. त्यामुळे महापालिकेने बेपत्ता असलेल्यांची माहिती पोलिसांकडून मागवली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ही व्यक्ती कोठून बेपत्ता झाली, याची माहिती मिळाल्यावर तिचा शोध घेण्यात येईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.