विलेपार्लेमध्ये आगीत पाच ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मुंबई - विलेपार्ले पश्‍चिमेकडील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बुधवारी (ता. 6) रात्री झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात आठ जण जखमी झाले असून, यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

विलेपार्ले येथील कैफी आझमी पार्कनजीक "प्रार्थना' या 13 मजली इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर लाकडांचा साठा ठेवण्यात आला होता. तेथेच काही मजूर राहत होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास तेथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन बचावकार्यास सुरवात केली. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. आगीत होरपळलेल्या मजुरांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाला.

Web Title: mumbai news 5 death in vile parle fire

टॅग्स