एसी लोकलची नवलाई ‘स्लो ट्रॅक’वर!

एसी लोकलची नवलाई ‘स्लो ट्रॅक’वर!

मुंबई - मुंबईतील पहिलीवहिली एसी लोकल सुरू होऊन दहा दिवस झाले. मुंबईकरांनी काही अंशी एसी लोकलला पसंती दर्शवली असली, तरी तिच्यासाठी नियमित गाड्यांच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. एसी लोकलच्या हायफाय तिकिटामुळेही त्यांना घाम फुटला आहे. सुरुवातीचे काही दिवस प्रवाशांचा एसी लोकलला प्रतिसाद मिळाला. मात्र नव्याचे नऊ दिवस संपल्याचे चित्र आहे.

नाताळच्या मुहूर्तावर पहिले पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर एसी लोकल बोरिवली ते चर्चगेटदरम्यान चालवण्यात आली. त्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून तिच्या नियमित १२ फेऱ्या सुरू करण्यात आल्या. नुकताच एसी लोकलने दहा दिवसांचा पल्ला गाठला. एसी लोकल कोणत्या फलाटावर येणार त्याबाबत अद्याप पूर्णपणे उद्‌घोषणा केली जात नाही. एसी लोकलचे वेळापत्रकच प्रवाशांना माहिती नसल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यावर समोर आले आहे. दहा दिवसांत एसी लोकलमधून अवघ्या ३४ हजार १९२ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून पश्‍चिम रेल्वेला १४ लाख ७८ हजार १०२ रुपये उत्पन्न मिळाले.

एसी लोकलमध्ये प्रवाशांसाठी प्रथम श्रेणीच्या डब्याप्रमाणे सीट लावण्यात याव्यात, प्रथम श्रेणीच्या पासधारकांना प्रवास करण्यास प्रवेश द्यावा, फलाटावरील इंडिकेटरवरही एसी लोकलचा उल्लेख असावा, मेट्रोप्रमाणे कोणत्या दिशेला दरवाजे उघडले जाणार त्याबाबत उद्‌घोषणा करण्यात यावी, वर्दळीच्या वेळी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात आदी सूचना प्रवासीवर्गाकडून करण्यात आल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com