पोलिस संरक्षणानंतरच प्रार्थनास्थळांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई - रस्त्यांवरील आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेकायदा प्रार्थनास्थळांवर कडेकोट पोलिस संरक्षण मिळाल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत १६९ प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतरच कारवाई होणार असल्याने मुदत पाळण्याचे आवाहन अधिकाऱ्यांसमोर आहे. कुर्ला परिसरात सर्वाधिक म्हणजे ३१ प्रार्थनास्थळे आहेत.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ४९५ पैकी ३२६ प्रार्थनास्थळांवर पालिकेने आतापर्यंत कारवाई केली आहे. उर्वरित प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्यासाठी प्रभागाच्या सहायक आयुक्तांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. वांद्रे, खार आदी परिसरात रस्त्यावर ख्रिस्ती समाजाचे क्रॉस आहेत. त्यावरही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. ते १०० वर्षांहून अधिक जुने आहेत, असा दावा स्थानिक नागरिक करीत आहेत. ते इतर ठिकाणी हलवता येऊ शकतात. मात्र, पालिका अधिकारी प्रतिसाद देत नसल्याची खंतही स्थानिक रहिवासी व्यक्त करीत आहेत.

मुदत पाळण्याबाबत साशंकता
कुर्ला परिसरात सर्वाधिक बेकायदा प्रार्थनास्थळे आहेत. त्याखालोखाल वांद्रे आणि खार पश्‍चिम परिसरात २० आणि वांद्रे-सांताक्रूझ पूर्व परिसरात १५ प्रार्थनास्थळे रस्त्याच्या आड आहेत, अशी माहितीही देण्यात आली. अजोय मेहता यांनी १७ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्यावर कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पोलिस बंदोबस्त मिळाल्यानंतरच कारवाई होणार असल्याने मुदत पाळण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स