अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी ज्युनिअर लीडर स्पर्धेत जिंकली मुलांची मने

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबादेवी (मुंबई) : सकाळ समूह आयोजित विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर लीडर खुली स्पर्ध्येच्या प्रमोशन कार्यक्रमात शिरोळकर समूह चिकित्सक हायस्कुल येथे विद्यार्थ्याशी मनमोकळया गप्पा मारताना "तू माझा सांगाती..ची आवली" आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली चित्रपटातील सुनबाई या भूमिका करणारी अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी उपस्थित 300 मुलांची मने जिंकून सभागृहात नव चैतन्य आणले.

मुंबादेवी (मुंबई) : सकाळ समूह आयोजित विद्यार्थ्यांसाठी ज्युनिअर लीडर खुली स्पर्ध्येच्या प्रमोशन कार्यक्रमात शिरोळकर समूह चिकित्सक हायस्कुल येथे विद्यार्थ्याशी मनमोकळया गप्पा मारताना "तू माझा सांगाती..ची आवली" आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या फॅमिली चित्रपटातील सुनबाई या भूमिका करणारी अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी उपस्थित 300 मुलांची मने जिंकून सभागृहात नव चैतन्य आणले.

मुले म्हणजे देवा घरची फुले, माझ्या ही घरी माझी मुलगी असते तिही तुमच्या सारखी हुशार आहे आणि गोंगाट करुन घर डोक्यावर घेते. तुम्हाला मी भेटायला आले आणि मला माझे बालपण आठवले. त्यांनी मुलांशी गप्पा मारण्यास सुरुवात करताच मुलांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

तुकाराम महाराजांची कलर्स वाहिनी वर सुरु असलेली माझी मालिका 'तु माझा सांगाती' मध्ये मी त्यांची पत्नी आवली ची भूमिका करतेय. आमची घरे फार जुनी आहेत. मी नऊवारी साडी नेसते. गावाकड़े असल्याने चुल आहे, मी भाकरी करते. मला फार आवडते. यात वारकरी सांप्रदाय आणि तुकाराम महाराजांचे अभंग फारच छान आहेत. तुम्हाला कळायला थोड़ा वेळ जाईल पण कळेल. संत कान्हो पात्रा, संत सखु, संत पुंडलिक यांच्याही गोष्टी आहेत. त्या गोष्टी कीर्तनातून तुकाराम महाराज सांगतात.आपण पुस्तक वाचतो ते भावतेच पण मालिका पाहताना आपल्याला फार चांगले शिकायला मिळते. या गोष्टी आयुष्यभर आपल्या सोबत असतात. त्या मुळे चांगली पुस्तके वाचा चांगल्या मालिका पहा, मैदानी खेळ खेळा छान आनंदी जीवन जगा आणि भरपूर शिकुन फार मोठे व्हा असे म्हणाल्या. त्यांनी मुलांमध्ये मिसळून सकाळचे स्पर्धा फॉर्म वाटले. त्यांच्याशी हात मिळविले. अगदी लहाण पण देगा देवा! असे म्हणत त्याही लहान मुलां मध्ये मिसळल्या. त्यांच्या या लडिवाळाला विद्यार्थी खुश झाले त्यांनी या अभिनेत्रीला मना पासून आपलेसे केले.

ऋतुजा ताईचा ऑटोग्राफ घेण्यासाठी मुलींनी त्यांना अक्षरशः घेरावच घातला. त्यांनी हसत हसत या गोड मुलींना जवळ घेत त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवताना ऋतुजा यांचे मन भरून आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलींनी सुंदर असे श्रवणीय स्वागत गीत गायले.शाळेचे मुख्याध्यापक राजेन्द्र गोसावी आणि उप मुख्याध्यापिका अमृता पाटणकर यांनी ऋजुता देशमुख यांचे स्वागत सत्कार केला.

मुलांनो फार मोठे व्हा! चांगला अभ्यास करा!
अभ्यास करणे हा आपल्या आयुष्याच्या अविभाज्य घटक आहे!पण इतर खेळ  खेळणे,विविध स्पर्धांमध्ये भाग घेणे हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे. सकाळ चा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा नवा आकार देईल.सर्व विद्यार्थी मित्रांना भविषया साठी हार्दिक शुभेच्छा!