इलेक्‍ट्रिक वाहन धोरण लागू करा - आदित्य 

इलेक्‍ट्रिक वाहन धोरण लागू करा - आदित्य 

मुंबई- प्रदूषणामुळे मुंबईची दिल्ली होऊ नये यासाठी राज्यात "इलेक्‍ट्रिक वाहन धोरण' लागू करण्यात यावे, अशी मागणी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता. 18) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. 

इलेक्‍ट्रिक बसप्रमाणे इलेक्‍ट्रिक एसटीही आणाव्यात, अशा मागणीचे पत्र ठाकरे यांनी आज रावते यांना दिले. मुंबई-पुणे, पुणे-नगर, पुणे-कोल्हापूर मार्गावर इलेक्‍ट्रिक एसटी बस सुरू कराव्यात, अशी सूचना आदित्य यांनी रावते यांना केली आहे. राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्‍ट्रिक सायकल, दुचाकींना सरकारने प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सुचवले आहे. 

दरम्यान, एसटीच्या 100 कि.मी. पल्ल्याच्या बस इलेक्‍ट्रिक करण्याबाबत लवकरच धोरण अमलात आणणार असल्याची माहिती रावते यांनी दिली. एस. टी. कामगार संघटनेने वेतनवाढीच्या मागणीवरून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे, यावर भाष्य करणे रावते यांनी टाळले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com