सावंत हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुंबई - शिवसेनेचे नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. विशाल गायकवाड आणि अनिल वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. 

मुंबई - शिवसेनेचे नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी समतानगर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. विशाल गायकवाड आणि अनिल वाघमारे अशी त्यांची नावे आहेत. पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. 

कांदिवली पूर्वमधील समतानगरचे माजी नगरसेवक सावंत यांची पाच जानेवारीला हत्या झाली होती. यापूर्वी पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मुलाच्या चौकशीत विशाल आणि अनिल यांची नावे उघड झाली होती. सावंत यांच्या हत्येनंतर आरोपी हे कल्याणला पळून गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी रक्ताने माखलेले कपडे बदलले. विशाल हा एका फरारी आरोपीचा नातेवाईक आहे. विशालने आरोपीला वाहनाने सोडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी काल (ता. 11) विशालला कल्याण येथून अटक केली. त्याच्याकडून एक वाहन जप्त केले आहे. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करून आज (ता. 12) अनिल याला अटक केली. घटनास्थळाची पाहणी करणे, आरोपींना माहिती पुरवण्यास मदत करण्याचे काम अनिल करत होता. सावंत कोठे जातात, कोणत्या वेळेस कोणाला भेटतात, रात्री घरी कधी येतात, याची माहिती मुख्य आरोपीला अनिलने पुरवल्याचे तपासात उघड झाले. त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला गुरुवापर्यंत (ता. 18) पोलिस कोठडी सुनावली आहे. हत्येत आणखी पाच-सहा आरोपींचा समावेश असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्य आरोपीकडूनच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

Web Title: mumbai news ashok sawant murder case