तीन दिवस बॅंका बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - बॅंकांचे कामकाज शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बंद राहणार आहे. उद्या शनिवारी (ता.30) आणि सोमवारी (ता.2) सार्वजनिक सुटी असल्याने बॅंका 30 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या दरम्यान बंद राहणार आहेत. सलग सुट्यांमुळे रोकड टंचाई आणि धनादेश वटण्यास विलंब होण्याची शक्‍यता असल्याने ग्राहकांना आजच बॅंकांची कामे उरकावी लागणार आहेत.

दसऱ्यानिमित्त शनिवारी बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे. सोमवारी (ता.2) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुटी असून, या दिवशीही बॅंका बंद राहतील. त्या पार्श्‍वभूमीवर गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी आजच बॅंकांचे व्यवहार पूर्ण करावेत, असे आवाहन बॅंकांकडून करण्यात आले आहे. सध्या दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग असून, बॅंका बंद असल्याने ग्राहकांना रोकडसाठी एटीएमवर अवलंबून राहावे लागेल.