खतनिर्मिती करणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत द्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - "स्वच्छ मुंबई' योजनेअंतर्गत सुक्‍या आणि ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात पाच ते 10 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली. या मागणीबाबत पालिका आयुक्त सकारात्मक असल्याचे समजते. 

मुंबईत कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. सध्या कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण करण्यात येत आहे. अनेक सोसायट्या या मोहिमेत सहभागी झाल्या असून, त्यांनी आवारात कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत बहुतांश छोट्या सोसायट्या असून, त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने त्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करू शकत नाहीत. त्यामुळे नगरसेवक निधीतून अशा सोसायट्यांना मदत करण्यास नगरसेवकांना परवानगी द्यावी. कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या सोसायट्यांना मालमत्ता करात पाच ते 10 टक्के सवलत द्यावी, अशी मागणी भाजपच्या उत्तर मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष विनोद शेलार यांनी आयुक्त मेहता यांची भेट घेऊन केली. उत्तर मुंबईतील भाजपचे नगरसेवक या वेळी त्यांच्यासोबत होते. मालाड येथील रस्त्यांवर मूलभूत सुविधा, पथदिवे, गरीब विद्यार्थ्यांसाठी एकलव्य अभ्यासिका, सार्वजनिक शौचालयांत पाणी आणि विजेची सोय करून द्यावी आदी मागण्याही त्यांनी केल्या. या मागण्यांबाबत आयुक्त सकारात्मक असल्याचे शेलार यांनी सांगितले.

Web Title: mumbai news bjp Discounts tax on property taxpayers