भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल

पूनम कुलकर्णी
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबईः भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज (शुक्रवार) ते मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना शहा भेटणार का? शिवसेना-भाजप मधील राजकीय संबंध यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरु असतानाच शहा आज मुंबईत दाखल झाले आहेत.

शहा यांनी मुंबईमध्ये येताच दादरच्या शिवाजी पार्क परिसरात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याळाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर शिवाजी पार्कात असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. त्याबरोबर त्यांनी चैत्यभूमीलाही भेट दिली. सावरकर स्मारकात असलेल्या स्वा. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुंबईत पोहचताच शहा यांनी वीर सावरकर, शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ चैत्यभूमी या ठिकाणी प्रथम भेट दिली.

यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तमिल सेल्वन आदी भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

फोटो गॅलरी