गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - सराफाला धमकावून 80 हजारांची खंडणी घेणाऱ्या गुन्हे शाखेच्या तोतया अधिकाऱ्याला माहीम पोलिसांनी शनिवारी (ता. 21) अटक केली. निशांत परमार (वय 32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो दहिसर येथील रहिवासी आहे.

तक्रारदार जयंतीलाल जैन यांचे माहीममध्ये संघवी ज्वेलर्स नावाची सराफी पेढी आहे. त्यांना दूरध्वनी करून परमार याने स्वतःला पुणे रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगितले. एका महिलेला आम्ही अटक केली असून, तिच्याकडून तुम्ही चोरीचे सोने खरेदी केले आहे, असे धमकावत परमारने खंडणी मागितली होती. मात्र, चौकशीत परमार तोतया असल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी परमारला अटक केली.