वाशी येथून 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सदर मुलास संशयित आरोपीे वाशी रेल्वे स्टेशन प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वरून गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेन मधून घेऊन जात आहे.

नवी मुंबई : वाशी येथील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या अवघ्या 3 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले असून, मुलाचे नाव रघु नाना शिंदे असे आहे. सदर मुलाचे अपहरण करणारा संशयित सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाला आहे.

सदर मुलास संशयित आरोपीे वाशी रेल्वे स्टेशन प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वरून गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेन मधून घेऊन जात आहे. आरोपीचे चालण्यावरून तो नशेत असल्याचे दिसत आहे.

आरोपीने हिरवा-पांढरा रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातली आहे. आरोपीचा रंग सावळा असून त्याच्या डाव्या कानात बाळी आहे. वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.