कोस्टल रोड १७ फूट उंच!

कोस्टल रोड १७ फूट उंच!

मुंबई - शहराच्या पश्‍चिम किनारपट्टीवर बांधण्यात येणारा कोस्टल रोड समुद्राच्या भरती पातळीपासून सुमारे १७ फूट उंच ठेवण्याची शिफारस राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) केली आहे. त्यामुळे लहानसान वादळे आणि सुनामी यांचा धोका कोस्टल रोडला फारसा जाणवणार नाही, असे मानले जात आहे. 

नरिमन पॉईंट ते वरळी सागरी सेतूपर्यंतच्या कोस्टल रोडच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने ‘एनआयओ’कडून अहवाल मागवला होता. त्या अहवालात अशी शिफारस करण्यात अाली आहे. ‘एनआयओ’चा अहवाल प्राथमिक अाहे. ‘एनआयओ’ला सखोल अभ्यास करून अहवाल तयार करण्याची शिफारस केली असल्याचे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

एनआयओच्या शिफारशीनुसार कोस्टल रोडची उंची १७ फुटांपेक्षा जास्त ठेवली जाण्याची शक्‍यता आहे. कोस्टल रोडमुळे निर्माण होणाऱ्या मोकळ्या भूखंडांची उंची त्यापेक्षा जास्त ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे.

पाण्याचा निचरा  होण्यास मदत 
कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकल्यामुळे शेकडो एकर मोकळे भूखंड तयार होणार आहेत. त्यामुळे काही भागांत पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या कमी होईल. कोस्टल रोडबरोबरच पर्जन्यवाहिन्याही बांधण्यात येतील. मोकळे भूखंड आणि पर्जन्यवाहिन्यांमुळे शहराची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल. काही भागांतील पाण्याचा निचरा होण्याचा वेग वाढेल, असा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com