स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मुंबई - इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या निविदा प्रक्रियेला थंडा प्रतिसाद मिळाला आहे. केवळ महिनाभराच्या कालावधीत एकानेच स्वारस्य दाखवले आहे. असे असले तरीही इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू करावे, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी येथे दिले.

इंदू मिल येथे स्मारक उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बडोले बोलत होते. ते म्हणाले, ""स्मारकाच्या कामकाजासंदर्भात मागविण्यात आलेल्या निविदेस अल्प प्रतिसाद मिळाल्याने या संदर्भात नव्याने अल्प कालावधी देऊन निविदा मागविण्यात येऊन ही प्रकिया पूर्ण करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे कामकाज येत्या दोन महिन्यांत सुरू करावे. इंदू मिल येथे स्मारकाची माहिती देणारे डिजिटल फलक 6 डिसेंबर पूर्वी लावण्यात यावेत. तसेच येथे स्मारकाची प्रतिकृती ठेवावी. या स्मारकाच्या ठिकाणी उभारण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जगातील सर्वांत उंच पुतळा राहणार असल्याने याचे काम उत्तम रीतीने व्हावे, याचीही दक्षता घ्यावी.''

Web Title: mumbai news cold response for the memorandum of the tender process