नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक करणारे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मुंबई - ऑनलाइन पोर्टलद्वारे नामांकित कंपनीतील नोकरीचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील टोळीचा विलेपार्ले पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून 13 मोबाईल आणि संगणकाची हार्ड डिस्क जप्त करण्यात आली. यातील मुख्य सूत्रधारासह तिघे जण फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंकजकुमार रविकुमार हांडा, संजीव ब्रिजमोहन गर्ग, अभिषेक जगदीश प्रसाद, अजयकुमार जगदीश प्रसाद, सुमन सौरभ कुमार मय्यन सिंग अशी अटक आरोपींची नावे आहेत. नवी दिल्लीत त्यांनी कार्यालय थाटले होते. नोकरीकरिता अर्ज केलेल्यांना ते फोनवरून माहिती देत. त्यानंतर संबंधितांची नोकरीसाठी निवड झाल्याचे त्यांच्या एचआर विभागातून कळवले जायचे. मुलाखतीकरिता शुल्काच्या नावाखाली ते पैसे उकळत. याच पद्धतीने त्यांनी एकाची तीन लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी संबंधिताने विलेपार्ले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून शुक्रवारी (ता. 11) पाच जणांना दिल्लीहून अटक केली.