"गेम ऑफ थ्रोन्स' प्रेयसीसाठी चोरला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई - "गेम ऑफ थ्रोन्स' या अमेरिकन मालिकेचा एक भाग चोरीला गेल्याप्रकरणी एक प्रेम कथा उघड होण्याची शक्‍यता आहे. चोरी प्रकरणातील आरोपीने प्रेयसीला पाहण्याकरिता मालिकेच्या भागाची चोरी केल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्याच्या या कबुलीची पोलिस पडताळणी करीत आहेत. पकडले जाऊ नये याकरिता आरोपी एकमेकांशी "स्काईप'द्वारे एकमेकांच्या संपर्कात होते, असेही तपासात स्पष्ट झाले आहे. 

"गेम ऑफ थ्रोन्स'चे "यूआरएल' तयार करणारा आरोपी अलोक शर्मा याची प्रेयसी या मालिकेची चाहती आहे. तिच्या सांगण्यावरूनच आपण मालिकेचा हा भाग "लिक' केल्याचे शर्माने चौकशीत सांगितले. आरोपींचे स्काईपवरील संभाषण तपासले जाणार आहे. हे संभाषण मिळण्याकरिता पोलिसांनी संबंधित कंपनीकडे मागणी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

या प्रकरणी अटक झालेले आरोपी अभिषेक घडियाल, मोहम्मद सुहैल, भास्कर रविचंद्र जोशी आणि अलोक शर्मा यांच्या पोलिस कोठडीत 24 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

टॅग्स