सांस्कृतिक विभागाचे संकेतस्थळ नावापुरतेच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे संकेतस्थळ अनेक महिन्यांपासून अद्ययावत करण्यात न आल्याने अर्ज वा प्रकल्प, योजनांच्या माहितीसाठी लोककलावंत, सांस्कृतिक संस्थांना सांस्कृतिक विभागात खेटे घालावे लागत आहेत.

सांस्कृतिक विभागाचे संकेतस्थळ नव्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या प्रयत्नांना केव्हा यश येईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सध्या या संकेतस्थळावर पर्यटन धोरण 2016, लोकमान्य गणेशोत्सव अभियान आणि लोकमान्य उत्सव एवढीच माहिती अद्ययावत स्वरूपात आहे. पूर्वी सांस्कृतिक विभागाच्या अन्य योजना, कार्यक्रम, अनुदानासंदर्भातील माहिती, अनुदानाचे अर्ज, विविध कार्यक्रमांच्या निविदा याविषयीची माहिती या संकेतस्थळावर होती. ही माहिती सध्या संकेतस्थळावर दिसत नाही. हे संकेतस्थळ कामासाठी नव्हे, तर नावापुरतेच सुरू आहे.

या संदर्भात सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते नव्या स्वरूपात दिसेल.

Web Title: mumbai news cultural department website