दादर स्थानकाला बाबासाहेबांचे नाव द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

दादर - दादर रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी ‘भीम आर्मी संघटने’ने दादर रेल्वेस्थानकात पोस्टर लावून केली. तसेच दादर नव्हे; तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ म्हणा, असे आवाहनही त्यांनी या वेळी उपस्थितांना केले. 

मुंबईमध्ये एखाद्या रेल्वेस्थानकाला राममंदिर हे नाव असू शकते; तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दादर रेल्वेस्थानकाला द्यायला काय समस्या आहे? कमी वेळा मागणी करूनही रेल्वेस्थानकाला राममंदिर नाव दिले गेले; परंतु अनेकदा मागणी करूनही दादर स्थानकाला बाबासाहेबांचे नाव दिले जात नाही. म्हणून आम्ही अनोख्या पद्धतीने रेल्वेस्थानक परिसरात नामांतराचे पोस्टर लावून आमची मागणी सरकारपुढे मांडत आहोत, असे भीम आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोक कांबळे यांनी सांगितले. 

दादर मध्य व पश्‍चिम रेल्वेवर स्थानक परिसरात; तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला हे नामांतराचे पोस्टर लावण्यात आले होते.

Web Title: mumbai news dadar railway station dr babasaheb ambedkar bheem army