'गोविंदा'वर ड्रोनची नजर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

मुंबई - या वर्षी गोपाळकाला आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आले आहेत. गोपाळकाल्यानिमित्त शहरात उभारल्या जाणाऱ्या हंड्या, मानवी थरांचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिक घराबाहेर पडतात. या पार्श्‍वभूमीवर अनुचित घटना घडू नये, यासाठी या उत्सवावर यंदा "ड्रोन'; तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

मुंबईत उभारल्या जाणाऱ्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून उभारले जाणारे मनोरे पाहण्यासाठी नागरिक; तसेच परदेशी पाहुणेही हजेरी लावतात. यंदा गोपाळकाला आणि स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी आल्याने सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी नुकतीच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी पोलिस बंदोबस्तासह गर्दी होणाऱ्या प्रमुख दहीहंड्यांच्या परिसरात ड्रोन; तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमार्फत नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गृह खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन नको!
गोपाळकाल्याच्या दिवशी गोविंदा पथकांतील अनेक सदस्य हेल्मेटशिवाय दुचाकी चालवतात. काही ट्रिपल सीटही घेतात. अनेक जण ट्रकच्या टपावर बसून प्रवास करतात. चार वर्षांपूर्वी सायन येथे ट्रकच्या टपावर बसलेल्या गोविंदाचा लोखंडी पोलचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्‍वभूमीवर गोविंदांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: mumbai news drone watch on govinda