डीआरटी अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

मुंबई - मध्यस्थामार्फत सात लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सोमवारी डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनलच्या (डीआरटी) मुंबईतील रिकव्हरी अधिकाऱ्याला अटक केली. बी. एस. साने असे त्याचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडून मध्यस्थाच्या नावाचा सात लाखांचा धनादेश घेतला होता. मध्यस्थालाही अटक करण्यात आली आहे. आरोपी अधिकाऱ्याच्या 65 लाखांच्या मुदत ठेवी, नऊ लाखांची किसान विकास पत्रे व काही मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे सीबीआयच्या हाती लागली आहेत. याबाबत सीबीआय अधिक तपास करत आहे. 

टॅग्स