खडसेंना 15 लाख भरण्याचे स्मरणपत्र 

खडसेंना 15 लाख भरण्याचे स्मरणपत्र 

मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी "रामटेक' या सरकारी बंगल्याचा वापर केल्याबद्दल असलेली 15 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी भरली नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याने स्मरणपत्र पाठवले आहे, अशी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना या विभागाने माहितीच्या अधिकारात दिली आहे. 

खडसे यांना वितरित केलेल्या "रामटेक' या सरकारी बंगल्याबाबत गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे माहिती मागितली होती. या विभागाने गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 19 जून 2016 ला बंगला रिकामा करणे आवश्‍यक होते. माजी मंत्र्यांस पहिले 15 दिवस सरकारी निवासस्थान निःशुल्क वापरता येते. त्यानंतर तीन महिन्यांसाठी सरकारच्या परवानगीने प्रतिचौरस फूट 50 रुपये दराने आणि त्यानंतर पुढील तीन महिन्यांसाठी शंभर रुपये दराने दंड आकारण्यात येतो. सरकारने खडसे यांना तीन महिने बंगला वापरण्याची परवानगी दिली होती. त्यांच्याकडे 19 नोव्हेंबर 2016 पर्यंत "रामटेक' बंगल्याच्या वापरापोटी 15 लाख 49 हजार 985 रुपयांची थकबाकी आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com