'व्हीआयपीं'मुळे नातलगांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

मुंबई - एलफिन्स्टन पुलावरील दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक केईएममध्ये येत होते. धक्का पचवणे अशक्‍य होते. शवविच्छेदन विभागाबाहेर मृतांच्या नातेवाइकांची गर्दी झाली होती. रुग्णालयात "व्हीआयपी' आणि "व्हीव्हीआयपी' येऊ लागले आणि सर्वसामान्यांचे हाल सुरू झाले.

अनेक तास उन्हात उभे राहिल्यामुळे रुग्णांच्या काही नातेवाइकांना भोवळ आली. त्यांना पाणी विचारण्याची तसदी ना प्रशासनाने घेतली ना नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी.

या दुर्घटनेत मसूद आलम जखमी झाले आहेत. त्यांच्या नातेवाइकांनी केईएममध्ये धाव घेतली, तेव्हा त्यांना मसूद यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यांच्या नातेवाइकांचा धीरच सुटला. मोहम्मद शकील यांचे नातेवाइकही आले. ते वयोवृद्ध असल्याने त्यांना भोवळ आली. साधारण 12.30 वाजल्यापासून केईएममध्ये जखमी आणि मृतांचे नातेवाईक उभे होते. त्यात गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेतेही होते. प्रत्येकजण कोरडी चौकशी करून जात होता.