अग्निशमन दलात फायर बाईक

अग्निशमन दलात फायर बाईक

मुंबई - आगीच्या वाढत्या दुर्घटना आणि दुर्घटनास्थळी बचावकार्यासाठी पोहोचण्यास लागणारा वेळ पाहता मुंबई अग्निशमन दल फायर बाईक आणण्याच्या तयारीत आहे. या बाईकमुळे अग्निशमन जवानांना दुर्घटनास्थळी जलद पोहोचून मनुष्यहानी टाळणे शक्‍य होईल.     

मुंबई अग्निशमन दलात नुकतीच क्विक रिस्पॉन्स व्हेईकल दाखल झाली. आता फायर बाईकही दाखल होईल. अग्निशमन दलाच्या वाहनांना शहरातील वाहतूक कोंडीतून दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी गर्दीच्या वेळी सरासरी १५ ते १७ मिनिटे तर उपनगरात २० ते २२ मिनिटे लागतात. बचावकार्यासाठी कॉल आल्यावर कमीतकमी वेळेत दुर्घटनास्थळी पोहचून मनुष्यहानी टाळण्याचा अग्निशमन दलाचा मुख्य उद्देश आहे. छोटी आग विझवण्यासाठी फायर बाईक उपयुक्त ठरेल, असा अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास आहे.

आग विझवण्यासाठी बाईकवरच ४० लिटरचा वॉटर टॅंक बसवण्यात येणार आहे. फायर पंप, होज पाईपचा रीळ आणि गनही बाईकवर बसवण्यात येईल. चार किलो क्षमतेची दोन अग्निशमन उपकरणे (फायर एस्टिंगुशर) बाईकवर बसवण्यात येतील. पाच फायर बाईक घेण्याची अग्निशमन दलाची तयारी आहे. 

तांत्रिक आव्हान
बाईकवरील वॉटर टॅंकमधून पाणी खेचून आग विझवण्यासाठी इंजिनचा वापर करण्यात येणार असल्याने अग्निशमन दलाला ३४५ सीसी क्षमतेच्या बाईकची आवश्‍यकता आहे. भारत स्टेज युरो चार इंजिन असलेल्या बाईक उपयुक्त ठरतील, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यासाठी रॉयल एनफिल्ड बुलेटचा आग्रह धरण्यात आला आहे. दलाला आवश्‍यक असलेले विशिष्ट क्षमतेचे इंजिन बाईक कंपन्या तयार करीत नसल्याची मुख्य अडचण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com