घारापुरीसाठी वन विभागाची आठवडाभरात "एनओसी'

घारापुरीसाठी वन विभागाची आठवडाभरात "एनओसी'
मुंबई - घारापुरी लेणी परिसरात विजेच्या कामासाठी वन विभागाने हरकत घेतली आहे. वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवण्यासाठी आणखी आठवडा लागणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घारापुरी लेणी परिसरात डिझेल जनरेटर बंद पडल्याने या ठिकाणचा वीजपुरवठाही 25 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे स्थानिकांच्या अडचणीत भर पडली आहे. "एनओसी' मिळाल्यानंतर काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. घारापुर लेणी परिसरात वीज यंत्रणेचे जाळे टाकण्याचे 90 टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे; मात्र वन विभागाच्या क्षेत्रातील टप्पा अपूर्ण राहिल्याने या ठिकाणी विजेचे काम अपूर्ण राहिले. "एनओसी'साठीची आवश्‍यक कागदपत्रे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याचा तपशील नागपूर वन विभागाला कळवण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com