दरोड्याच्या तयारीतील चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मुंबई - जुहू परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघांना जुहू पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) गजाआड केले. 

मुंबई - जुहू परिसरातील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौघांना जुहू पोलिसांनी शुक्रवारी (ता. ११) गजाआड केले. 

आरोपींची नावे झेव्हीर न्यान दयाळ, मोहन देवेंद्र, मनीष देवेंद्र, जुम्मन कादेम शेख अशी आहेत. आरोपींकडून पोलिसांनी चाकू, मिर्चीपूड, नायलॉनची दोरी जप्त केली आहे. जुहू पोलिसांचे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी जुहूच्या लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा घालण्यासाठी चार जण येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी तातडीने लक्ष्मी ज्वेलर्स परिसरात सापळा रचला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चारही आरोपी लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी येताच पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफिने अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.